पार्ट ३ : रस्ता बंद आंदोलन मोर्चा काढणे यामुळे जन सामान्याच्या जीवनावर होणारे जीव घेणारे दुष्परिणाम

0

 

 

 

 

यदकदाचित सरकारने मोर्चा काढण्याकरता एक रस्ता मुख्य रस्त्याच्या बाजूला लागून केलाच तर त्या रस्त्याचा उपयोग ज्या ज्या वेळेस आंदोलन किंवा मोर्चा नसेल त्यावेळेस तो रस्ता इतर वाहना करता वापरता येऊ शकतोसरकारची मानसिकता जर असेल तर अशा प्रकारचे रस्ते हे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण केले जाऊ शकतात ज्याच्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाण्या येण्यास अडथळा निर्माण होणार नाही व मुख्यतः वाहतूक सुरळीत राहील.

 

ज्या ज्या वेळेस आंदोलन होईल किंवा मोर्चा निघेल त्या त्या वेळेस शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लवकर घरी सोडण्यात येऊ शकते किंवा असे महाविद्यालय व शाळांना निघणाऱ्या आंदोलन व मोर्चाची पूर्वकल्पना दिल्यास ज्यावेळेस आंदोलन किंवा मोर्चा निघणार आहे त्या वेळेच्या अगोदर शाळा व महाविद्यालय भरवण्यात येईल, असे केल्यास विद्यार्थ्यांची मुख्यतः लहान मुलांची गैरसोय होणार नाही.

 

मोर्चा असो किंवा आंदोलन असो ती निघण्याची वेळ बहुतेक करून सकाळी दहाच्या नंतर व सायंकाळी सहाच्या अगोदरच असते, परंतु मोर्चेकरी व आंदोलनास येणारे लोक आदल्या दिवशी किंवा वेळेच्या दोन तीन तास अगोदर शहरांमध्ये निरनिराळ्या खाजगी व सरकारी वाहनांमध्ये येत असतातअशा वेळेस ज्या लोकांना फॅक्टरीमध्ये, किंवा सरकारी व निम सरकारी कार्यालयामध्ये जायचे असते त्याच वेळेस मुख्य रस्ता जाम होतो व यात प्रत्येकाला जीव घेणा त्रास होतो. या अशा गर्दीमध्ये एखादी अंबुलन्स थांबते त्यावेळेस मधील पेशंटला दवाखान्यामध्ये औषध  उपचारा करता पोहोचता येत नाही.  मी मध्यंतरी असे पेपर मध्ये वाचल्याचे आठवते की अहिल्यानगर शहरांमध्ये ज्यावेळेस मुख्य रस्त्यामध्ये वाहतूक जाम झाली त्यावेळेस ॲम्बुलन्स ला दवाखान्यात न जाता आल्यामुळे त्या ॲम्बुलन्स मधील पेशंट चा मृत्यू झाला. असे प्रसंग भविष्यामध्ये टाळावयाची असल्यास सरकारी कर्मचाऱ्यांची  कार्यालयामध्ये जाण्याची वेळ ही दोन तास अगोदर व सायंकाळी कार्यालय सुटण्याच्या अगोदर दोन तास नेहमी करता करण्यात यावीअसे केल्यास सरकारी कर्मचारी वाहतुकीमध्ये अडकणार नाही तो वेळेवर कार्यालयामध्ये पोहोचेल.

 

उर्वरित पार्ट न ४ मध्ये

 

 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
To Top