(१५) कदाचित तुम्हाला माहित असेल
कुठलाही व्यापारी किंवा त्याची मुले कधीही कोणत्याही राजकीय पुढाऱ्याच्या मागे
पुढे करत नाही, त्यांच्या कोणत्याही राजकीय सभेत जात नाही, त्यांचा प्रचार करत
नाही, सतरंज्या उचलत नाही, त्यांच्या
मागेपुढे करत नाही, किंवा कोणत्याही
मंडळाचे, सहकारी संस्थेचे, ग्रामपंचायतीचे, जिल्हा
परिषदेचे, पंचायत समितीचे कधीही निवडणूक लढवत नाही, किंवा
तसा अट्टहासही करत नाही, कारण त्यांना गुलामगिरी आवडत नाही, जितका
वेळ ते ाजकीय पुढार्याच्या मागे फिरण्यास लावतील तितका वेळ किंवा त्यापेक्षा
जास्त वेळ स्वतःच्या आई-वडिलांच्या व्यवसायामध्ये ते सतत मदत करत असतात, ही मदत
करत असताना ते हे बघत नाही की त्यांचे शिक्षण किती झाले आहे, किंवा ते
किती उच्च शिक्षित आहे, त्यांना माहित आहे, त्यांना
जाणीव आहे की त्यांच्या आई-वडिलांनी वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळलेला असल्यामुळे
तेही पुढे त्यांचे शिक्षण बाजूला सारून व्यवसाय करण्यास धजत नाही, लोकांची
लाज बाळगत नाही. मी बघितले आहे या व्यापारांची उच्चशिक्षित मुले जे व्यवसायाने
डॉक्टर ,वकील किंवा इतर कोणत्याही नोकरीमध्ये समाविष्ट असले तरी जसा जसा त्यांना
वेळ मिळेल ते त्यांच्या आई-वडिलांच्या किंवा वडिलोपार्जित
व्यवसायामध्ये झोकून देतात, मदत करतात म्हणूनच त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली
असते. इकडे, शेतकऱ्यांची
मुले, शिक्षण घेत असताना किंवा शिक्षण पूर्ण केल्यानंतर
त्यांच्या आई-वडिलांना त्यांच्या शेतीमध्ये मदत करत नाही, कष्ट करत
नाही हे जेव्हा आपण बघतो त्यावेळेस असे वाटते की आपली मुले ना धड शिक्षणामध्ये
पुढे आहे किंवा शेती व्यवसायामध्ये पुढे आहे. शेतकऱ्यांची तरुण मुलांना
शेती करण्यास कमीपणा वाटतो, त्यांच्या
शेतामध्ये झालेला माल ते कधीही स्वतः विकण्यासाठी आठवडी किंवा बाजारामध्ये घेऊन
जात नाही, का की त्यांना याची लाज वाटते, त्यांना
आजूबाजूंची लोके नावे ठेवतील अशी त्यांना भीती वाटते आणि याच कारणामुळे त्यांची
आर्थिक परिस्थिती त्यांना संधी असतानाही सुधरत नाही. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने, किंवा
त्यांच्या मुलाने शेती हा त्यांचा धंदा नसून व्यवसाय आहे व या व्यवसायाला
नफ्यामध्ये रूपांतरित करावयाचे असेल तर कुटुंबातील प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तीने
वाटेल ते काम करण्याची तयारी ठेवावी लागेल. असे केले तरच कुटुंबाचा उदरनिर्वाह
कोणत्याही प्रकारचे कर्ज न घेता चालेल.
(१७) शेतकऱ्यांच्या
मुलांनी आजपर्यंत असे कधी बघितले का त्यांनी निवडून दिलेला आमदार, खासदार , मंत्र्यांच्या
मुलांनी कधी शेती केली का ? माझ्या
माहितीप्रमाणे त्यांच्या मुलांनी कधीच शेती केलेली नसते याउलट ते एखाद्या सहकारी
साखर कारखान्याचे, सूतगिरणीचे, कृषी
उत्पन्न बाजार समितीचे, किंवा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून
निवडून दिले जातात किंवा येतात. शेतकऱ्यांच्या
मुलांनी, किंवा ज्यांना आपण छोटे-मोठे कार्यकर्ते म्हणतो, अशा
कार्यकर्त्यांनी वेळोवेळी राजकीय पक्षांच्या पुढाऱ्याच्या नादी लागून स्वतःच्या
अंगावर पोलीस केसेस घेतलेले असतात, त्या
पोलीस केसेस त्यांना त्यांच्या आयुष्यभर पुरतात, पण एक
गोष्ट नक्की आहे कुठल्याही मंत्र्याच्या खासदाराच्या आमदाराच्या मुलावर आंदोलन
केले म्हणून कोणतीही पोलीस केस आज पर्यंत माझ्या बघण्यात आलेली नाही. मग ही सत्य
परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या मुलांनी ा पुढार्यांच्या नादी का
लागतात याचे उत्तर मला अजून मिळाले नाही. म्हणून शेतकरी असो किंवा त्याची मुले असो
किंवा अजून कोणी असो यांनी सर्वांनी त्यांचा शेती व्यवसाय हा पूर्णतः
राजकारणापासून दूर ठेवावयास पाहिजे, असे नाही केल्यास आपली येणारी पिढी बरबाद
होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून
आपण वेळेवर सावधगिरी बाळगून पुढारी लोक आपल्याला वेड्यात काढत आहे असे समजून
त्यांच्या मागे लागून आपल्या शेती व्यवसायाचा बट्ट्याबोळ करू नये.
(१६)
शेतकऱ्यांनी अजून एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे कोणतेही
सरकार असू द्या ते कधीही तुमच्या बाजूने उभे राहणार नाही, त्याचे
कारण असे आहे की शेतकऱ्यांना मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार यांनी
गृहीत धरलेले आहे की तुम्ही त्यांना शंभर टक्के मतदान करणार.
त्यांनी तुम्हाला गृहीत धरण्याची कारणे मी थोडक्यात इथे मांडतो, तुम्हाला
निवडणुकीच्या अगोदर शेतकरी राजा, बळीराजा असे
संबोधून, गोंजरण्याच्या प्रयत्न करतो,. तुम्हाला
वीज बिलामध्ये सबसिडी देण्यात येईल, तुमचे
कर्ज माफ करण्यात येईल, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात येईल, तुमच्या
मुला मुलींना चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्यात येईल, बेरोजगारांना
महिना भत्ता देता येईल, तुमच्या शेतीमालाला कधीच न मिळालेला
डबल भाव देण्यात येईल, अशा प्रकारची प्रलोभने दाखवण्यात येतात
आणि आपण नेमकं त्या प्रलोभनामध्ये अडकतो व त्यांना मतदान करतो. हेच लोकप्रतिनिधी
निवडून आल्यानंतर त्यांनी तुम्हाला जे जे प्रलोने निवडणुकीच्या अगोदर दिले होते
त्याचा एक टक्काही भाग किंवा फायदा तुम्हाला देत नाही किंवा देण्याचा प्रयत्नही
करत नाही. तुमच्यावर जे जे संकट मग ते नैसर्गिक असो किंवा ओढावलेले असो त्यातून
तुमची सुटका करण्यासाठी किंवा तुम्हाला आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडे
किंवा राज्य सरकारकडे तुमच्यासाठी आर्थिक मदत मागत नाही. एवढेच नाही. पण आमदार
असेल तर विधानसभेमध्ये तुमच्या बाबतीत कधीही बोलणार नाही सरकारला विचारणार नाही
जसा आमदार वागतो तसच खासदार वागतो तोही लोकसभेमध्ये तोंड उघडत नाही. ही परिस्थिती
वर्षानुवर्षे चालत आलेली आहे, या
परिस्थितीमध्ये किंवा शेतकऱ्यांच्या समस्या मध्ये येत किंचितही फरक झालेला नाहीये, भारत
स्वतंत्र झाल्यापासून ते आजपर्यंत त्याच्या पदरामध्ये ना त्याला पाहिजे असलेला
शेती भाव मिळाला, किंवा त्याचे कर्ज माफ झाले, किंवा
त्याला वीज माफी मिळाली, असे कधीही झाले नाही आणि मी तुम्हाला
खात्रीने सांगतो पुढे सुद्धा हे होणार नाही. त्याचे कारण असे आहे, की
तुम्ही ज्या लोकांना निवडून देता तेच लोक तुमचा घात करतात , तुम्हाला
वाऱ्यावर सोडतात.
(१८)
आपण दिलेल्या लोकप्रतिनिधी तो आपले काम करत नाही,, तो
आपल्याला बघत नाही वेळ प्रसंगी धावून येत नाही, याला
थोडा बहुत प्रमाणामध्ये अपवादही असू शकतो, परंतु
असे वाचण्यात आले, बघण्यात आले, की सहसा
एखाद्या लोकप्रतिनिधी विरुद्ध राग असेल तर ोकविरुद्ध बाजूच्या पक्षाच्या राजकीय
पुढार्याला निवडून देतात, पण ज्याला निवडून आणलेले असते तोही एका
राजकीय पक्षाचाच पुढारी असतो आणि त्याचीही विचारसरणी हरलेल्या उमेदवारापेक्षा काही
कमी नसते. एखादा उच्चशिक्षित, मग तो
वकील असेल,, डॉक्टर असेल इंजिनीयर असेल, किंवा
ज्याने त्याच्या आयुष्यामध्ये मोठमोठाली पदे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये
राहून मिळवलेली असेल, आणि अशी जर का अशी व्यक्ती निवडणुकीला
उभी राहिली तर, अशा व्यक्तीचे आपण विचार ऐकत नाही,, त्यांच्या
जवळ जात नाही ते आपल्याकरता का निवडणुकीला उभे राहिले याचा विचारही करत नाही, त्यांना
काय गरज आहे आपल्यासाठी घरदार सोडून उन्हा तान्हा मध्ये फिरवून प्रचार करण्याची, त्यांची
आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही ते निवडणुकीच्या भानगडीत का पडले ? कोणाकरता पडले ? कशाला पडले ? याचा आपण कधीच
विचार करत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या उलट अशा लोकांना बालीश प्रश्न
विचारण्यात येतात, ते म्हणजे भुईमूग जमिनीच्या खाली येतं
का वर येत, तुम्ही कधी नांगर धरला का, तुम्हाला
रुमन्न, वख्खर माहित आहे का ? , तुम्हाला
पाळी देता येती का ? , तुम्हाला मोटर चालू करता येती का,? रब्बी
पिक म्हणजे काय ? खरीप पिक म्हणजे काय ? असे अवाजवी प्रश्न विचारण्यात येतात. तुम्ही
ज्या लोकांना निवडून दिले त्या लोकांना, हे सगळं
माहीत होतं हे तुमच्यातीलच होते, तुमचे भाऊबंद
होते,, तुमचे नातलग होते, तुमचे
पाहुणे होते तुमचे मामा, दादा काका, होते मग यांनी निवडून आल्यानंतर तुमच्याकरिता
काय केले, असे कधी आपण त्यांना विचारले का ?
अपूर्ण, पुढील भाग पार्ट ४ मध्ये
तारीख १९-१-२०२५
