रस्ता बंद आंदोलन, मोर्चा काढणे यामुळे जनसामान्यांच्या जीवनावर होणारे जीव घेणारे दुष्परिणाम पार्ट २

0

 

 

तसं जर बघितलं तर ज्या ज्या वेळेस आंदोलन किंवा मोर्चा निघतात त्याची पूर्व सूचना लिखित स्वरूपामध्ये जिल्हाधिकारीपोलीस खाते व तसेच संबंधित मंत्रालयातील विभागांना दिलेली असतात.  ज्यावेळेस ही निवेदने लिखित स्वरूपात जिल्हाधिकारीपोलीस खाते किंवा संबंधित व्यक्तींना ज्यावेळेस मिळते त्याच वेळेस शहरातील ज्या मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा किंवा आंदोलन होणार आहे याची संपूर्ण माहिती या विभागाना त्या शहरातील स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये देणे अपेक्षित असते.  परंतु अशी माहिती स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये दिली आहे की नाही याची खातरजमा संबंधित विभागाने करणे गरजेचे आहे.

 

ज्या ज्या मार्गावरून किंवा रस्त्यावरून आंदोलन किंवा मोर्चा निघणार आहे तो रस्ता किती वाजेपासून ते किती वाजेपर्यंत बंद ठेवणार आहे याची संपूर्ण माहिती वर्तमान पत्राच्या व्यतिरिक्त लिखित स्वरूपामध्ये फ्लेक्स च्या माध्यमातून ज्या रस्त्यावरून हा मोर्चा जाणार आहे तिथे लावणे अपेक्षित आह.

 

खरं तर सरकारने याबाबतीमध्ये वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे कोणताही मोर्चा किंवा आंदोलन सरकारने कधीही हलक्यामध्ये घेऊ नये.  आंदोलन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयापेक्षा सरकारने नेहमी करतात एखाद्या मैदान ताब्यात घेऊन आंदोलकांनी इथेच आंदोलन करावे असा नियम केल्यास काही वावगे ठरणार नाही.  बऱ्याच वेळेला असे बघण्यात येते की आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी हा कधीही आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहत नाही, तसे करणे त्यांच्याकरता जरुरीचे असते पण बऱ्याच वेळेला ते तिथे जात नाही हे दिसून येते, अशा वेळेस सरकारने असा नियम पास करावा की प्रत्येक आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी तिथे जाऊनच स्वीकारावे, असे केल्यास जे आंदोलन रस्त्यावर होणार आहे ते होणार नाही.

 

सरकारने नेहमीसाठी आंदोलन व मोर्चा काढण्याकरता एक रस्ता मुख्य रस्त्याच्या बाजूला निर्माण करावा आणि त्या रस्त्याचा उपयोग कटाक्षाने फक्त आंदोलन व मोर्चा काढण्यासाठीच राहील असा सक्त नियम केल्यास आंदोलनकर्त्याची किंवा मूळच्या घेऊन येणाऱ्यांची गर्दी मुख्य रस्त्यावर येणार नाही जेणेकरून कोणतीही वाहतूक मध्ये अडथळा निर्माण होणार नाही, सरकारचे मानसिकता जर असेल तर अशा प्रकारचा रस्ता किंवा नियम सरकारला करणे तसं काहीच अवघड नाहीये.  

प्रत्येक शहरांमध्ये एक बघण्यात येते की साधारण सकाळी नऊ ते बारा व  व संध्याकाळी पाच ते आठच्या दरम्यान मुख्य रस्त्यावरील वाहतूक जाम होते, त्याचे कारण एक तर असे असावे की या वेळेमध्ये बहुतेक सरकारी कार्यालय, निम सरकारी कार्यालय व ज्या ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची हजेरी आवश्यक असते ते कर्मचारी याच वेळेला कार्यालयामध्ये जातात व परत येतात.

सरकारने नेहमीसाठी आंदोलन व मोर्चा काढण्याकरता एक रस्ता मुख्य रस्त्याच्या बाजूला निर्माण करावा आणि त्या रस्त्याचा उपयोग कटाक्षाने फक्त आंदोलन व मोर्चा काढण्यासाठीच राहील असा सक्त नियम केल्यास आंदोलनकर्त्याची किंवा मूळच्या घेऊन येणाऱ्यांची गर्दी मुख्य रस्त्यावर येणार, अशा वेळेस त्यांच्याकडे अपुरा स्टाफ असल्यामुळे ह्या आंदोलनाकडे किंवा मोर्चाकडे थोडाफार प्रमाणामध्ये दुर्लक्ष होते आणि याचा फटका जनसामान्यांना बसतो हे नाकारता येत नाही. 

 

पुढील भाग पार्ट ३               २३-१-२०२५

 

 

 

 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
To Top