आज-काल कोणताही सामाजिक कार्यकर्ता, एखादी सामाजिक संस्था किंवा काही अराजकीय पुढारी एखादी वाईट घटना घडल्यानंतर सरकारचे लक्ष
त्यांच्याकडे वेधण्यासाठी रस्ता
बंद आंदोलन किंवा मोर्चा काढण्याचे प्रकार सर्रास होत आहे. करत
असलेले आंदोलन किंवा काढत असलेल्या मोर्चा बद्दल कोणाच्याही मनामध्ये अढी असण्याचा
प्रश्न उद्भवत नाहीत, परंतु
यामुळे जनसामान्यांच्या जीवनावर नक्कीच दुष्परिणाम झाल्याचे दिसून येते.
ज्यावेळेस
आंदोलन होते किंवा मोर्चा काढण्यात येतो नेमकी ती वेळ कार्यालयामध्ये
जाणाऱ्यांची ज्यामध्ये शाळेत व महाविध्यालयात जाणारे विध्यार्थी सरकारी, निमसरकारी, खाजगी
कर्मचारी असते ज्यांना
वेळेवर कार्यालयामध्ये हजर राहणे गरजेचे असते या व्यतिरिक्त सरकारी किंवा खाजगी
दवाखान्यामध्ये जाणारे कर्मचारी डॉक्टर हेही असतात, हे लोक कधी त्यांच्या वाहनाने, किंवा सरकारी वाहनाने किंवा
खाजगी वाहण्याने जात असतात, आणि ज्या
वेळेस हे लोक त्यांच्या कामासाठी जातात त्याच वेळेस मोर्चा किंवा आंदोलन जाणाऱ्या
रस्त्यावरून निघालेले असते. ह्या मोर्चामुळे मुख्य रस्त्यावरचे वाहतूक बंद केली
जाते किंवा बंद होते आणि यामुळे त्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी होऊन
ह्या लोकांना आहे तिथेच थांबावे लागते.
कधी कधी
तर असा प्रसंग येतो की इमर्जन्सी मध्ये जेव्हा एखादी ॲम्बुलन्स पेशंटला घेऊन जाते
त्या ॲम्बुलन्सला सुद्धा रस्ता मिळत नाही आणि पर्यायाने ज्या व्यक्तीला औषध
पाण्याची गरज आहे त्या व्यक्तीला वेळेवर औषध उपचार होत नाही किंवा आवश्यक असलेली
मेडिकल ट्रीटमेंट मिळत नाही आणि पर्यायाने त्या रुग्णाचा त्यामुळे मृत्यू होऊन
जातो.
जेंव्हा असे आंदोलन होते किंवा मोर्चा निघतो अशा वेळेस
सरकार व पोलीस विभागावर ताण पडतो आणि बऱ्याच वेळेला कायदा आणि सुरक्षा ठेवण्यासाठी ज्या पोलीस दलाची नेमणूक केलेली असते अशा वेळेस त्यांच्याकडे
अपुरा स्टाफ असल्यामुळे ह्या आंदोलनाकडे किंवा मोर्चाकडे थोडाफार प्रमाणामध्ये
दुर्लक्ष होते आणि याचा फटका जनसामान्यांना बसतो हे नाकारता येत नाही.
सरकारने वेळोवेळी निघत असणार निघणारे
मोर्चे व आंदोलन याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे आणि रस्त्यावर वाहतुकीमध्ये
अडथळा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
तारीख २२-१-२०२५
पुढील भागात
