पार्ट २ शेतकरी हा स्वतः; स्वतःचा जानी दुश्मन आहे

0

 


 

 

(६)   प्रत्येक वर्षी जमिनीचा सामू तपासण्यात यावा.   शेतकरी जे जे पीक शेतांमध्ये घेणार आहे त्यासाठी शेतामध्ये असलेली माती  योग्य त्या प्रतीची आहे की नाही यासाठी त्या मातीचे परीक्षण व विहिरीमध्ये असलेल्या पाण्याचे परीक्षण करण्यात यावे.. परीक्षणामध्ये  मातीत किंवा पाण्यामध्ये  काही कमतरता-दोष  आढळल्यास शेतजमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी योग्य त्या प्रमाणात औषधांचा वापर करण्याचा सल्ला शेती तज्ञ देत असतात.

 

(७)  शक्यतो रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खते, गांडूळ ,शेणखते यांचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा.

 

(८)  ज्या शेतांमध्ये आपण फळांची झाडे घेतो तिथे शक्यतो नैसर्गिक शेती करण्याचाच प्रयत्न करावा जेणेकरून पेस्टिसाइड  किंवा तृणनाशक औषधाचा  वापर शेतातील त्रण किंवा गवत  काढण्यासाठीवापरण्याची गरज पडणार नाहीआशा फळबागांमध्ये गवत वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी कटरचा वापर करण्यात येऊ शकतो.

 

(९)   गावातील शेतकऱ्यांमध्ये विश्वास असेल तर, प्रत्येक खेड्यामध्ये सामूहिक पद्धतीने शेती केल्यास त्या गावातील तरुणांना शेतीमध्ये काम करण्याची संधी मिळेल व त्या प्रमाणात रोजंदारी उपलब्ध होईल.  सामूहिक पद्धतीमध्ये मजुराच्या खर्च, यंत्रसामुग्रीचा खर्च पेस्टिसाइड व खत पाण्याचा खर्च कमी प्रमाणात होतो व झालेला खर्चही समप्रमाणात शेतकऱ्यांमध्ये विभागण्यात येतो तसेच सामूहिक शेतीतून उत्पन्न झालेल्या शेतीमालास गावातूनच तो शेतीमाल एकत्रित करून बाजारामध्ये सहज नेता येऊ शकतो असे केल्यास वाहतुकीचा खर्च प्रत्यक्ष शेतकऱ्याचा सहजपणे वाचू शकतो.

 

(10)  शेतकऱ्यांची तरुण मुले   वडिलोपार्जित   शेती करण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे  व शहरातील  झगमगाट बघून शेती व्यवसाय हा संपूर्णतः मागे पडत आहे.   ही तरुण मुले शहरांमध्ये जातात पण त्यांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला मिळत नसल्यामुळे वाईट संगतीत गुंतून पडतात.   ही तरुण मुले त्यांच्या आई-वडिलांबरोबर शेती जर करायला लागले तर ते शेतीला पूरक असलेला व्यवसाय किंवा जोडधंदा जसे की, पशुपालन, दुधाचा धंदा इत्यादी इत्यादी करून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवू शकतात.

 

(11)   शेतकऱ्यांनी व त्यांच्या तरुण  मुलांनी राजकीय पुढारी व राजकीय पक्ष यापासून पूर्णपणे दूर झाले तर त्यांचे लक्ष शेती करण्यामध्ये लागू शकतेत्यांनी असे न केल्यास सगळ्यात जास्त आर्थिक नुकसान व शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये बेरोजगारी राजकीय  ुढार्‍यांमुळे प्रत्येक गावामध्ये निर्माण झाली आहे असे जर म्हटले तर खोटे होणार नाही!

 

(12)   प्रत्येक शेतकऱ्यांनी व त्यांच्या तरुण मुलांनी शेती आणि शेती फक्त नफा देणारी कोंबडी आहे असे मनात पक्के ठाण मांडून व्यवसायाच्या हिशोबाने शेती जर केली तर प्रत्येक शेतकऱ्याची व त्यांच्या तरुण मुलांची आर्थिक परिस्थिती सुधारेल व पर्यायाने त्यांना पाहिजे असलेले शिक्षण सुद्धा घेता येऊ शकेल.

 

(१३)  शक्यतो प्रत्येक शेतकऱ्याने त्याचा शेतीचा माल स्वतः च बाजार मध्ये नेऊन विकण्याचा प्रयत्न करावा.  आजकाल शहरातील लोकांना सकाळी सकाळी लवकर ताजा भाजीपाला पाहिजे असतो अश्या वेळेस ज्या रस्त्याला वाहतूक जास्त प्रमाणात आहे त्या रस्त्याच्या बाजूला त्यांचा चांगल्या प्रतीचा शेती माल ते विकू शकतात किंवा असे ज्यांना करता येत नाही अश्या लोकांनी शहरातील मोठमोठाल्या इमारतीमध्ये जाऊन तेथील रहिवाश्यांना त्यांचा माल ते विकू शकतात.  ह्यामुळे काय होईल शेतकर्यांना जास्तीत जास्त गिराहिक मिळतील व तसेच त्या लोकांची कशी गरज आहे हे ही त्यांचाशी त्यांना विचार वीनिमय करता येईल.

 

(१४) प्रत्येक शेतकऱ्याने हे लक्षात घेतले पाहिजे की त्याची समस्या तोच सोडवू शकतो, या बाबतीत कोणताही राजकीय पुढारी मग तो त्याचा कितीही जवळचा नातलग किंवा पाव्हणा असू द्या तो त्याच्या काहीही कामाचा नाही. आज पर्यंत  ज्या ज्या राजकीय पुढारान्या तुम्ही निवडून आणले त्यांनी तुमचे कोणतेही काम ज्या मुळे तुमचे आर्थिक प्रश्न सुटतील, तुमच्या मुला मुलीना यांच्या कोलेज मध्ये फुकट प्रवेश दिला नाही, त्यांच्या साखर कारखान्यात किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये साधी चपराशी ची नौकरीही दिली नाही किंवा असे काही केले नाही की आयुष्भर तुम्हाला पुरतील एवढे पैसे दिले नाही आणि ते पुढेही काहीच तुमच्या करीता करनार नाही हे मी तुम्हाला खात्रीने लिहून देतो , परंतु एक गोष्ट तुम्हाला कदाचित रुचणार नाही पण ती मान्य करावीच लागेल आणि ती म्हणजे राजकीय पुढाऱ्यांची ज्यांना तुम्ही आणि तुमच्या मुलांनी त्यांना निवडून आणण्यात मदत केली, तुमच्या जीवाचे रान केले आणि त्यांनी काय केले  त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांचा पुढील सात पिढ्या बसून खातील अशी व्यवस्था  करून ठेवली आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगतो त्यांच्या पासून जितके दूर तुम्ही जाल त्याच गतीने तुम्ही स्वालंबी व अधिक श्रीमंत व्हाल .

 

पुढील भागात पार्ट ३ मध्ये

तारीख १८ जानेवारी २०२५

   

 

 

 

 

 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
To Top