जाहिराती व आपण

0

 


आजकाल वर्तमानपत्र असू द्याटीव्हीवरील मालिकाबातम्या,असू द्या  जाहिरात बाय डिफॉल्ट असतेच. कधी कधी असे वाटते की आपण फक्त जाहिरातच बघतो.  एखादी मनोरंजाने भरलेली किंवा नवीन नवीन विषयाला  धरून मालिका जर असेल तर ही मालिका बघण्यातील आनंद नाहीसा होतो.  जाहिरात किती प्रमाणामध्ये द्यावी, कुठे द्यावी, कशी द्यावी याबाबतीत असलेल्या नियमाचा भंग  सर्रासपणे होत आहे. 

कुठलेही वर्तमानपत्र आपण हातात जर घेतले तर आपल्याला दिसून येईल प्रत्येक पानावर छोटी मोठी जाहिरात छापलेली असते. एवढेच काय वर्तमानपत्रातील पहिले पान खरं म्हटलं तर या पानावर महत्त्वाची बातमी, किंवा एखादी घटना छापणे अपेक्षित असताना या पानावर सर्रास मोठमोठाली जाहिरात प्रसिद्ध केलेली असते.  या जाहिरातीमुळे होते काय वर्तमान पत्रातील पाने वाढतात व पर्यायाने त्या वर्तमानपत्राची किंमत सुद्धा वाढत असते.  वर्तमानपत्राचा खरा उद्देश या जाहिरातीमुळे बाजूला पडतो हे दुर्दैवाचे आहे.  या बाबतीमध्ये जो वर्तमानपत्र वाचतो त्याची निराशा होते व कालांतराने सततच्या जाहिराती वर्तमानपत्रात आल्यामुळे एक तर वाचकाचा कल कमी होतो किंवा कालांतराने तो ते वर्तमानपत्र घेण्यास बंद करतो.  आजच्या युगामध्ये तसेही मोबाईल मुळे वर्तमानपत्र वाचणाऱ्यांची संख्या खूप कमी झाली आहे.  पण अजूनही असे बघण्यात येते की ज्या वर्तमानपत्रांमध्ये कमी जाहिरात प्रसिद्ध झालेली असते व त्या वर्तमानपत्रांमध्ये नकारात्मक बातम्या नसल्यामुळे त्या वर्तमानपत्राचा खप वाढलेला  असून वाचणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढलेली आपणास दिसून येईल.

 


खरोखर वर्तमानपत्रांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या किंवा मजकूर छापून आला पाहिजे की जेणेकरून वाचणाऱ्यांची जिज्ञास्या वाढण्यास प्रवृत्त होईल.  त्या वाचकाला काहीतरी आपण नवीन वाचतोय अशी जाणीव होणे फार गरजेचे आहे.  एक प्रकारच्या शिळ्या बातम्या जर असेल तर त्या वर्तमान पत्राची किंमत सुद्धा दिवसेंदिवस कमी होत जाते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सामान्य माणसांना त्यांचे जीवन जगत असताना भरपूर अडीअडचणी असतातत्या अडीअडचणीवर जर एखादा लेख आला किंवा ती अडचण कशा प्रकारे सोडवावी असे जर वर्तमानपत्र छापून आले तर त्या सामान्य माणसांना एक प्रकारचा धीर मिळेल व तो सहजपणे अडचणीवर मात करू शकतो. वर्तमानपत्र हे एक गुरु सारखे असते आणि या वर्तमानपत्राने गुरु सारखेच सतत ज्ञानमार्गदर्शन, वाचकांना द्यावे ही अपेक्षा जर वाचकाने ठेवली तर त्यात काहीही चुकीचे होणार नाही.  इथे मी कोणत्याही वर्तमानपत्राचे नाव देणार नाही परंतु एकंदरीत वेगवेगळ्या प्रकारचे वर्तमानपत्र वाचल्यानंतर त्याला काही अपवादही आहे परंतु  असे आढळून आले की सदरील वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीवर जास्त प्रमाणात  छापलेल्या आढळून येतात.

 

अपूर्ण

 

 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
To Top