SPEECH LEGAL
|
.
सध्या धकाधकीच्या जीवनात कुटुंबातील
प्रत्येक व्यक्ती त्याच्या कामानिमित्त नोकरी निमित्त,, व्यवसाय निमित्त
कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घराच्या बाहेर असतो. अशा परिस्थितीत त्याची किंवा तिची मुले शाळेत केंव्हा
जातात व केंव्हा घरी वापस येतात
याचा
त्यांना
थांग पत्ताही लागत नाही.
तो किंवा ती मुद्दाहून असे करत नाही पण
कामाच्या निमित्ताने घराबाहेर असल्यानंतर संध्याकाळी किंवा रात्री घरी येण्यास
उशीर झाल्यानंतर त्या मुलांशी त्यांचा संवाद होत नाही आणि हे चक्र
वर्षानुवर्ष चालत असते. आपल्या मुलांची जडणघडण कोणाच्या सानिध्यामध्ये किंवा कशा
प्रकारे होत आहे
ह्याचे
त्यांना भान नसते आणि भान आल्यानंतर बरेच पाणी डोक्यावरून
गेलेले असते.
सतत कामानिमित्त बाहेर असल्यामुळे
मुलांचा अभ्यास करून घेता येत नाही, तसेच अधून मधून त्यांच्या शाळेमध्ये जाऊन, शाळेतील शिक्षकांना भेटून आपल्या
पाल्यांची प्रगती कशी आहे हे विचारता नाही. हे होत नसल्यामुळे आजकाल त्यांच्या
पाल्यांना त्यांचे आई-वडील वेगवेगळ्या प्रकारचे महागडे पण वेळप्रसंगी कर्ज काढून ट्युशन लावतात.
त्यांची अशी धारणा असते की हे केल्यामुळे त्यांच्या पाल्यांची प्रगती व्यवस्थशीर होईल, प्रश्न येथे शैक्षणिक प्रगतीच्या नाहीये, पण ज्या वातावरणात ते वाढत आहेत त्या
वातावरणाचा त्यांच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार त्यांनी केलेला नसतो. दुसरे म्हणजे दिवसभर काम केल्यानंतर जेव्हा
पाल्यांच्या आई वडील थकून भागून घरी येतात, त्यावेळेस त्यांची मानसिकता त्यांच्या
पाल्यांशी संवाद साधण्याची नसते किंवा तसा वेळ किंवा परिस्थिती आली तरी आजकाल
टीव्हीवर येणाऱ्या अनाकलीय मालिका बघून ते त्यांचा वेळ वाया घालवतात. आजकाल कुटुंबातील प्रत्येक सदस्य
त्याच्या मोबाईलवर सतत लागलेला असतो एवढेच काय जेवणाच्या वेळेस सुद्धा तो मोबाईल
हातातून सोडत
नाही. घराच्या बाहेर पडल्यानंतर त्यांचे लोकांशी वागणे ,बोलणे कशा प्रकारचे आहे हे आई-वडिलांच्या लक्षात येत नाही येत नाही, सतत बाहेर असल्यामुळे व आई-वडिलांशी
संवाद नसल्यामुळे एकमेकांची मन, भावना प्रेम ,आस्था त्यांच्या स्वभावात दिसून येत नाही. आणि कळत नकळत कुटुंबातील प्रत्येक
व्यक्ती एकमेकांपासून दूर जात आहे. हे दूर जाणं फक्त शारीरिक नसून मनानेही व
स्वभावाने ही
दूर गेलेले असत. आणि म्हणूनच भावनिक गुंतागुंत जेव्हा न
समजण्याच्या पलीकडे जाते त्यावेळेस पाल्यांना योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे
त्यांच्यामध्ये एकाकीपणा, हटवादीपणा व नैराश्य निर्माण होते आणि
असे
जेव्हा
होते त्यावेळेस एक तर नको असलेली संगत किंवा वाईट प्रकारचे व्यसन लागण्याची शक्यता
नाकारता येत नाही.
प्रत्येक आई-वडिलांनी आपली मुले चिडखोर, हटवादी किंवा स्वभावाने एकाकी का होतात ह्याचे
निरीक्षण करणे गरजेचे व आवश्यक आहे. त्यांना काय आवडते व काय नाही आवडत ह्याची त्यांना जाण असणे फार महत्त्वाचे
आहे.
तसे
बघितले तर स्वभावाने व शरीराने प्रत्येक पाल्य हा आई-वडिलांची प्रति कॉपीच असतो
तरीसुद्धा ते आपल्या पाल्यांना ओळखण्यात कमी पडतात, कारण त्यांचे निरीक्षण सूक्ष्म पद्धतीने
सतत चालू असते.
तुम्ही
तुमच्या आई-वडिलांशी, मित्रांशी व अस्तित्वात असलेल्या
नातेवाईकांशी कसे वागतात, त्यांची किती चौकशी करतात व त्यांच्या
मदतीला धावून जातात की नाही ? हे ते सतत बघत असतात. जेव्हा तुम्ही तुमचा मुलगा, मुलगी लहान आहे त्याला काही कळत नाही असे जेव्हा म्हणता तेव्हापासूनच तो किंवा ती
तुमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हा पासूनच त्याच्या मनामध्ये ,वागण्यामध्ये तुमच्याबद्दल नकारात्मक
भावना निर्माण होते.
म्हणूनच आपल्या मुलांचे मुलींचे भवितव्य
व व्यक्तिमत्व उत्तम प्रकारे करावयाचे असल्यास सकारात्मक बाबींची जवळीक साधा. काहीच अशक्य नाही, प्रत्येक गोष्ट आपण सहजपणे करू शकतो अशी
भावना त्यांच्या मनामध्ये रुजू करा, तू हे करू शकत नाही किंवा तुला हे जमणार
नाही असे नकारात्मक वाक्य त्यांच्यासमोर कधीच उच्चारू नका. आजपासूनच त्यांना भरपूर
वेळ द्या, शाळेतून आल्यानंतर आपण आपल्या मित्राची
जशी काळजीपूर्वक चौकशी करतो तशीच किंवा त्याच धर्तीवर त्यांच्याशी जवळीक साधा, त्याने किंवा तिने दिवसभर काय काय केले, त्यांच्या शाळेत अभ्यासाच्या वेळेस काय
झाले याची सविस्तर नाही पण वरवरची चौकशी करणे ही गरजेचे आहे. शाळेत किंवा शाळेच्या बाहेर त्यांच्याशी
कोणी वाईट वागले का किंवा लहान मुलगी जर असेल तर तिला वाईट वागणूक मिळाली का याची
चौकशी आस्थेने करा,
काहीही
मग ते चांगले असो किंवा वाईट असो घरी आल्यावर सांगण्याची- ऐकण्याची सवय लावून
घ्या.
हे
सर्व करण्यासाठी फार फार तर तुम्हाला अर्धा तास लागेल, आणि प्रत्येक दिवसाला तुम्ही अर्धा तास
त्यांना सहज देऊ शकता. सुट्टीच्या दिवशी त्यांच्या आवडीचा छंद जोपासन्यास सहाय्य
करा.
आणि
शक्यतो तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे की त्यांच्यापासून लपवून ठेवू नका. एखाद्या वस्तूचा अट्टहास तुमची आर्थिक
परिस्थिती नसताना त्यांनी जर केला तर त्यांना समजावून सांगा ही वस्तू आपण घेऊ शकत
नाही,
जे
जमत नसेल ते नाही म्हणूनच सांगा आणि जे जमत असेल तिथेच हो म्हणा, असं केल्यामुळे त्यांची मानसिक परिस्थिती
हो किंवा नाही ऐकण्याच्या सानिध्यात सहजपणे येईल, आणि तुम्हाला ते समजून घेतील. थोडक्यात काय मी तर असे म्हणेल की तुम्ही
प्रॅक्टिकल व्हा,
