खरी गम्मत तर पुढे आपणास दिसून येईल आणि ती म्हणजे जेंव्हा
एखादी जाहिरात वर्तमानपत्रात छापून येते त्या वेळेस जवळपास प्रत्येक वर्तमानपत्रात
अगदी छोट्या अक्षरात ( ज्याला चष्मा असेल तोच वाचू शकतो ) ते एक निवेदन देतात आणि
त्या मध्ये असे लिहितात " या अंकात व अंकासोबत असलेल्या कोणत्याही पुरवणीत
प्रसिध्य होणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातीमधील मजकूर जाहिरातदाराने दिल्यानुसार
प्रसिध्य केला जातो. यातील कोणत्याही माहितीच्या अथवा आवाहनाच्या
सत्यतेबाबत वर्तमानपत्र हमी घेऊ शकत नाही, त्याची
कृपया वाचकांनी नोंद घ्यावी." म्हणजेच याचा अर्थ असा होतो की वाचकानी
त्याच्या स्वतः च्या जवाबदारी जाहिरातीमधील मजकूर वाचवा व उद्या तो जर फसला गेला
तर त्यांच्या वर्तमान पत्राची काहीही जवाबदारी राहणार नाही. याचा दुसरा अर्थ असाही
होऊ शकतो जो जाह्रीरातदार जाहिरात पाठवेल तो खर्च त्या व्यवसायामध्ये आहे की नाही
याची ते पडताळणी करत नाही किंवा आपण असे म्हणू या त्याने त्याच्या व्यवसायाबद्दल
खोटी जरी जाहिरात दिली तरी या वर्तमानपत्राची काहीच जवाबदारी राहणार नाही, म्हणजे
काय थोडक्यात जाहिरातदार वाचकांना फस्व्ण्यास तय्यार. म्हणजे मला असे वाटते वाचक गद्यात पडला तर पडला
अम्हाला काय त्याचे !
म्हणूनच वाच्कानो कोणतीही जाहिरात वाचल्या
नंतर त्या जाहिरातीच्या खरे खोटे पणाची पडताळणी करता येत नसेल तर अश्या प्रकारच्या
जाहिरात वाचूच नये, कारण अश्या प्रकारच्या जाहिरातीची ग्यारंटी व वारंटी ही नसते. वर्तमान पत्राचा व्यवसाय आहे पैसे घेऊन जाहिराती
प्रसिध्य करण्याचा परंतु वर्तमान पत्रावाल्यानी जे काही जाहिरातीबद्दल निवेदन
दिलेले असते ते ठळक व मोठ्या अक्षरात दिले तर बरे होईल असे वाचकांना वाटणे साहजिकच
आहे.
पुढील पार्ट ३ भागात
.....
