२३ सर्वात महत्वाचे गावातील
सर्व शेतकऱ्यांनी सुरवातीला एकत्र येऊन ते एकत्र सामुहिक शेती करण्यास तय्यार आहे
कि नाही या बाबत चर्चा सुरु करावी. मला माहित आहे जेंव्हा सर्व एकत्र शेतकरी गोळा
होतील त्या वेळेस प्रत्येक शेतकऱ्यांची भूमिका
काय आहे ह्या बाबत वेग वेगळे मतांतर दिसून येतील.
हरकत नाही , निदान या निमिताने सर्व शेतकरी एकत्र तर येतील. गावातील प्रगतशील शेतकरी या चर्चेस मुद्धाम हून
बोलवावे. तसेच गावामध्ये एखादा कृषी खात्यातील अधिकारी किंवा कर्मचारी असेल
त्यालाही बोलवावे. मी तर असे म्हणेल तरुण
असू द्या, वृद्ध असू द्या किंवा प्रतक्ष शेती करत नाही पण त्याला शेती मधील ज्ञान
असेल, बाजारातील शेती माला बाबत भाव काय
आहे ह्या बाबत तो जागरूक असेल अश्यांना चर्चा करण्यास प्राधान्य द्यावे.
उद्देश सुरवातीला एकच आहे या त्या निमितान्ने प्रत्येक शेतकर्याने
ह्या चर्चे मध्ये भाग घ्यावा.
अपूर्ण,
तारीख २१-१-२०२१
